अँड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल माळगाव प्रशालेचे इयत्ता 8 वी स्कॉलरशिप परीक्षेत उत्तुंग यश

यशश्री ताम्हणकर जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत प्रथम

चौके (प्रतिनिधी) : फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ॲड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल माळगाव या शाळेतील कुमारी. यशश्री गुरुनाथ ताम्हणकर हिने राज्य गुणवत्ता यादीमध्ये सोळावा क्रमांक व जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कुमारी भार्गवी नारायण कदम हिने तालुका ग्रामीण सर्वसाधारण मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला. दोन्हीही विद्यार्थिनींचे शाळेस व गावास अभिमानास्पद यश मिळवून दिल्याबद्दल माळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय खोत, उपाध्यक्ष अरुण भोगले, सेक्रेटरी हेमंत हडकर, सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक तुकाराम गिरी, माजी मुख्याध्यापक उदय जोशी तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना सागर मिसाळ, निकिता माळगावकर, रवळू बेनके, रणजित राणे, सिद्धिका जाधव तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापक यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

यशश्री ताम्हणकर

भार्गवी कदम

error: Content is protected !!