महिला स्वाधार मंचच्या अध्यक्ष माई सरवणकर यांचा सवाल
वैभववाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडीतील प्रिया चव्हाण या विवाहित महिलेनी आपल्या झालेल्या मानसिक छळाला कंटाळून, आत्महत्या करून, आज आठवडा होत येईल. त्यातील आरोपीत हे राजकीय वरदहस्त असल्याने, अटक पुर्व जामिनावर मोकाट झाले आहेत. त्या मुळे साक्षीदार याचे वर साक्षी साठी पुढे येण्याचे मोठे दडपण येऊं शकते. आणि त्यातील अजून एक संशयित असलेले बळीतचे सासरे हे तर चौकशी सामोरे जाऊ नये, म्हणून राजकीय वरदहस्त ठेवून सरकारी रुग्णालयाचा पाहुणचार घेत आहेत. म्हणजे सिंधुदूर्गात कायद्याचे राज्य आहे का ? हा आता प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न आहे. ह्या प्रकरणात माजी खासदार विनायक राऊत, हे स्वतः जातीने लक्ष घालायला येत आहेत. परंतु राज्य महिला आयोगाच्या कानावर तरी ही बातमी गेली आहे का?.. त्यांना सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रात येतो याबाबत माहिती नाही का? असा प्रश्न आमच्या सारख्या सर्व सामान्य जनतेला पडू लागला आहे. बेटी बचावो, लाडकी बहीण ह्या पेक्षा “सुरक्षित महिला” ह्या वर सरकार विचार करणार का?, का त्यांना वाऱ्यावर सोडणार.. अशा प्रश्न महिला स्वाधार ! मंच, सिंधुदुर्ग, अध्यक्षा माई सरवणकर यांनी माध्यमातून उपस्थित केला आहे.










