कवी विठ्ठल कदम यांच्या ‘चिमणकथा’ बालकथा संग्रहाची ‘SCERT’ च्या वतीने अभ्यासक्रमात निवड…!

आचरा (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेच्या वतीने शिक्षक लेखकांसाठी लेखन कार्यशाळा आयोजित करून शालेय विद्यार्थ्यांना अवांतर वाचनात रुची निर्माण करण्यासाठी शासनामार्फत ग्रंथ निर्मिती उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमात कुणकेरी शाळा नंबर 1 चे उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री.विठ्ठल कदम यांचा ‘चिमणकथा’ हा बाल्याच्या भावविश्वावर आधारित 40 बालकथा कथासंग्रह शासनाच्या वतीने निर्माण करण्यात आला आहे. हा ग्रंथ महाराष्ट्रातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या ग्रंथालयात दाखल झाला असून महाराष्ट्रातील शिक्षक व विद्यार्थी वर्गाने स्वागत केले आहे. ‘चिमणकथा’ या पुस्तकात चिमण हा मुलगा नायक असून त्याच्या भोवतालचे जग आणि त्याचे निरीक्षणे नोंदवणारा चिमण हा मुलगा पालक, शिक्षक व विद्यार्थी मित्रांशी संवाद साधताना दिसतो. विठ्ठल कदम यांचा यापूर्वीही एकदा काय झाले? कथासंग्रह, चार पावलं दूर बालकादंबरी व तुझा पदर तिरंगा हे बालसाहित्य प्रकाशित असून ‘रुमणी’ हा काव्यसंग्रह साहित्य प्रांतात गाजलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मनोहर परब व रामजी पोळजी यांचीही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. विठ्ठल कदम हे महाराष्ट्र शासनाच्या साहित्यिक व सांस्कृतिक मंडळावर सदस्य असून नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत.

error: Content is protected !!