कासार्डे उत्तर गावठण रस्त्याचा भराव कोसळला

ग्रामस्थांची ये-जा करण्याची झाली अडचण

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यामध्ये गेले दोन दिवस सतत जोरदार अतिवृष्टी सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे कणकवली तालुक्यातील कासार्डे उत्तर गावठण येथील पुलाजवळीलच रस्ता आज दुपारी १ च्या सुमारास कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक तसेच येण्याजाण्याचा मार्ग ठप्प झाला आहे. यामुळे उत्तर गावठण येथे असलेल्या सातशे लोकांचा दळणवळणांचा मार्ग बंद झाल्याने गैरसोय झाली आहे.

उत्तर गावठाण मधील जनतेला याच ब्रिजवरून ग्रामपंचायत म्हणा इतर इतरत्र ठिकाणी ये जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. संबंधित पुलावरील रस्ता कोसळल्याची माहिती समजतात कासार्डे गावातील सरपंच निशा नकाशे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, कासार्डे तलाठी, ग्रामविका अधिकारी तसेच गावातील इतर ग्रामस्थांनी त्या रस्त्याकडे धाव घेतली. येण्या जाण्याचा मार्ग बंद झाल्याने या मार्गावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी उत्तर गावठण मधून केली जात आहे.

error: Content is protected !!