सावंतवाडीत गांजासह युवक अटकेत; ६२ ग्रॅम गांजा जप्त

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील बाहेरचावाडा परिसरात स्वरूप हॉस्पिटलच्या पाठीमागील जंगलात गांजा बाळगल्याच्या आरोपाखाली एका युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ६२ ग्रॅम गांजा जप्त केला असून, या प्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल वडार (रा. कोलगाव) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून, तो गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. विशाल वडार याच्यासोबत काही अन्य युवकही उपस्थित होते, अशी माहिती पोलिसांनी दिली असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरीकांनी सतर्क राहून अशा गोष्टीची माहिती तात्काळ देण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!