जांभवडे, भरणी, सोनवडे, कुपवडे, घोडगे येथील विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
कुडाळ (प्रतिनिधी) : प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल यांच्या मार्फत कै. राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप रघुनाथ चौकेकर यांच्या सौजन्याने कुडाळ तालुक्यातील जांभवडे, भरणी, सोनवडे, कुपवडे, घोडगे येथील जि. प. प्रशालेतील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्याचा प्राणजीवन सहयोग संस्थेचा मानस आहे. त्याची सुरुवात संदीप चौकेकर यांनी कणकवली तालुक्यातील शाळांपासून केली होती. कोरोनाच्या काळातही प्राणजीवन सहयोग संस्थेने अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबविले होते. विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्याच्या स्तुत्य उपक्रमामुळे प्राणजीवन सहयोग संस्थेचे जिल्हाभरातून कौतूक होत आहे.
या रेनकोट वाटप कार्यक्रमावेळी संस्थेचे तालुका प्रतिनिधी प्रशांत गावडे, सदस्य सिद्देश परब, मिथुन लाड, मनीष परब, विद्धेश शेलार, नयन मडव, घोडगे सरपंच, जांभवडे उपसरपंच, कुपवडे पोलीस पाटील तसेच पालक, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.











