खारेपाटण रामेश्वर नगर येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण रामेश्वर नगर येथील रहिवासी असलेल्या केदार रवींद्र पाटील उर्फ गोटया वय – ४५ वर्षे या विवाहित युवकाने शुक्रवार दि. २५ जुलै, २०२५ रोजी सायंकाळीच्या दरम्यान आपल्या स्वतःच्या राहत्या घरात सीलिंगच्या हुकला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना रात्री ८.०० वाजता उघडकीस आली. युवकाच्या मृत्यू बाबत परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मयत युवक केदार पाटील हा खारेपाटण येथे लक्झरी व्यवसाय करून आपला कुटबाचा उदर निर्वाह चालवत होता. मात्र आत्महत्या कशामुळे केली हे समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास खारेपाटण पोलीस करत आहे. सदर व्यक्तीला जवळच्या प्रा. आ. केंद्र खारेपाटण येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र येथे त्याला मयत म्हणून घोषित करण्यात आले. शनिवारी २६ जुलै रोजी शवविचेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत व्यक्तीच्या पश्चात २ मुलगे, पत्नी, आई व भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच खारेपाटण पोलीस स्टेशनचे बिट अंमलदार देसाई, पोलीस काँटेबल अवधूत गुनिजन, पोलीस पराग मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत अधिक तपास खारेपाटण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत.

error: Content is protected !!