ते दिवस आठवा… तेव्हा का राजकीय संन्यास घेतला नाही ?

कणकवली (प्रतिनिधी) : वैभव नाईक आणि मला राजकीय संन्यास घेण्याचा सल्ला शिंदे सेनेच्या निलेश राणेंनी दिला. निलेश राणेंनी भाजपातून आमदारकीची उमेदवारी मिळणार नाही, रवींद्र चव्हाण आपला छळ करतात म्हणून राजकीय संन्यास घेण्याचे ट्विट केले होते. तेव्हा निलेश राणे हिमालयात का गेले नाहीत? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.

निलेश राणे आणि त्यांचे वडील आणि बंधू हे स्वार्थ साधण्यासाठी पक्ष बदलून आहेत. मध्यंतरी निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यातील ट्विटर वाद जनतेने पाहिला आहे. आज जरी निलेश राणे सोज्वळ वागत असले तरी जेव्हा निलेश राणे खासदारकीला पराभूत झाले तेव्हा निलेश राणे व्यवसनाधीन झाले होते हे कार्यकर्त्यानी पाहिले आहे. आमदारकीला निवडून येऊनही स्वतःला मंत्रिपद मिळाले नसल्याचे शल्य निलेश राणेंच्या मनात कायम आहे. निलेश राणेंना आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी भाजपाचे रवींद्र चव्हाण यांनी रसद पुरवली होती असे कार्यकर्ते म्हणतात. स्वतःला मंत्रिपद न मिळाल्याने निलेश राणे विधिमंडळात विरोधी पक्षाप्रमाणे विषय मांडून पालकमंत्री असलेल्या आपल्याच भावाला अडचणीत आणतात हे जनतेने पाहिले आहे.

आम्हाला राजकीय संन्यास घ्यायला सांगणाऱ्या निलेश राणेंनी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थ आहेत हे लक्षात ठेवावे. निलेश राणेंनी आता आपण कोणत्या नेत्याबरोबर जाणार हे सांगावे. एकनाथ शिंदेंसोबत राहणार की पक्ष सोडून जाणाऱ्या फुटीर गटासोबत जाणार हे सांगावे. ज्या उदय सामंताना खालच्या पातळीवर टीका केली तेच उदय सामंत आता निलेश राणेंना देव वाटू लागले आहेत. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत तुमच्या पक्षाचा पराभव करून जनताच पूढे तुमचे पार्सल मुंबईला पाठवेल असा टोला उपरकर यांनी लगावला आहे.

error: Content is protected !!