अबब! वैभववाडी शहरात भरवस्तीत आढळला ७ फुटी अजगर

अजगरास सर्पमित्र कांता मेस्त्री यांनी पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात सांगुळवाडी रोड नजिक साळवी यांच्या घराच्या पडवीमध्ये सकाळी नेहमीप्रमाणे झाडलोट करत असताना त्यांना साधारण ७ फुटांचा अजगर वेटोळे घालून पडवीच्या कोपऱ्यात आढळला. अजगराला पहाण्यासाठी शहरात एकच झुंबड उडाली होती. सदर बाब वनविभागाच्या निदर्शनास आणून देत सर्पमित्र कांता मेस्त्री यांनी त्यास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी वनरक्षक वैशाली कांबळे, दिपाली पाटील उपस्थित होते.

error: Content is protected !!