“होतो तो रस्तो बरो होतोssss” फोंडाघाट मधील रस्त्याची आणि नागरिकांची व्यथा!

फोंडाघाट (प्रतिनिधी) : मागणीवरून संबंधित विभागाने दखल घेतली आणि फोंडाघाट मधील तोंडे उघडलेल्या रस्त्यांच्या खड्ड्यामध्ये विभागाने सिमेंट काँक्रेट मिश्रित खडी भरून व्हायब्रेटर द्वारे रोलिंग केले. मात्र एकाच दिवसात पावसामुळे सर्व खडी बाजूला झाली. सिमेंट पाण्याबरोबर वाहून बाजारपेठेवर पांढऱ्या रंगाचा थर पसरला.

रस्त्यावरून येणाऱ्या ग्राहकांच्या पायाबरोबर घरभरजी दुकानात चतुर्थीपूर्वीच पांढरा रंग स्वयंगती पोहोचला आणि मारुतीवाडी – एसटी स्टँड समोरील खड्डे पुन्हा किंबहुना अधिक प्रमाणात आणि खोल झाल्याने वाहनधारकांना अधिकच कसरत करावी लागत आहे. कित्येकांना कंबरदुखी, सायटिका, वर्टिगो चा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे “होतो तो रस्तो बरो होतोsss” म्हणण्याची पाळी वाहनचालक आणि ग्रामस्थावर आली आहे. अर्थात या धोक्याची कल्पना संबंधित विभागाला यापूर्वीच येणे गरजेचे होते. कसरतीच्या रस्त्याच्या व्यथेमुळे वाहन चालक, ग्रामस्थ, व्यावसायिक यांच्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपघाताची शक्यता लक्षात घेऊन यावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे.

error: Content is protected !!