प्रशिक सचिन कोर्लेकर याचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : फेब्रुवारी २०२५ घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मुक्तांगण संचलित एन. एम. जोशी बृहन्मुंबई महानगर पालिका इंग्लिश स्कूल डिलाईड रोड शाळेतील ईयत्ता ५ वी तील विद्यार्थी प्रशिक सचिन कोर्लेकर याने शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश संपादन केले असून त्याचा गुणवत्ता यादीत स्कॉलरशिप साठी समावेश झाला आहे. त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी प्रशीक कोर्लेकर हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोर्ले, ता. देवगड येथील रहिवासी असून सद्या तो मुंबई येथे शिक्षण घेत आहे. तर प्रशिक याचे वडील सचिन कोर्लेकर हे युनिक अकॅडमी सिंधुदुर्ग स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक असून त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून अनेक विध्यार्थी प्रशासनात विविध पदांवर कार्यरत आहेत. त्याप्रमाणे अजूनही कोकणात भावी अधिकारी घडावेत यासाठी काम करत आहेत.

प्रशिक कोर्लेकर याला त्याच्या एन. एम. जोशी इंग्लिश स्कूल डिलाईड रोड मुंबई शाळेच्या मुख्याद्यापिका मृणाली वायकर, वर्गशिक्षिका नेहा सोलंकी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून या शाळेतून तो एकमेव विद्यार्थी गुणवत्ता यादीत आला आहे. नुकताच प्रशिक याचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला असून त्याने शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत यश संपादन केल्याबद्दल शासनाची त्याला स्कॉलरशिप मंजूर झाली आहे.

error: Content is protected !!