सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व डाकघरे २ ऑगस्टला राहणार बंद

४ ऑगस्टपासून स्मार्ट पोस्ट सेवा सुरू

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : डाक विभागाने पुढील पिढीच्या एपीटी ऍप्लिकेशनच्या अमंलबजावणीची घोषणा करताना अभिमान वाटतो जे डिजिटल प्रगती आणि राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. या परिवर्तनात्मक उपक्रमांतर्गत ही सुधारित प्रणाली सिंधुदुर्ग विभागातील प्रधान डाकघर आणि त्याअंतर्गत येणाऱ्या उपडाकघरांमध्ये तसेच शाखा डाकघरांमध्ये ४ ऑगस्टला लागू करण्यात येणार आहे. या प्रगत डिजिटल प्लॅटफॉर्मकडे सुरळीत आणि सुरक्षित संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी २ ऑगस्टला सर्व डाकघरामधील व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी दिली आहे.

या दिवशी कोणतेही पोस्टल व्यवहार पोस्ट ऑफिसमध्ये होणार नाहीत. ही तात्पुरती सेवा स्थगिती डेटा स्थलांतर, प्रणाली पडताळणी आणि संरचना प्रक्रियेसाठी आवश्यक आहे. जेणेकरुन नवीन प्रणाली सुरळीत आणि कार्यक्षमतेने सुरु करता येईल. एपीटी ऍप्लिकेशनचा उद्देश सुधारित वापरकर्ता अनुभव, जलद सेवा वितरण आणि अधिक ग्राहक-स्नेही इंटरफेस करणे आहे. जो अधिक स्मार्ट, कार्यक्षम आणि भविष्यातील डाकसेवा देण्याच्या आमच्या कटिबध्दतेचा भाग आहे.

ग्राहकांनी आपल्या भेटीचे पूर्वनियोजन करावे आणि या तात्पुरत्या अडथळ्यात आमच्याशी सहकार्य करावे, होणाऱ्या असुविधेबद्दल दिलगीर आहोत आणि आम्ही आपल्याला आश्वास्त करतो की या सर्व गोष्टी प्रत्येक नागरिकाला अधिक चांगल्या, जलद आणि डिजिटल सक्षमीकरणाच्या सेवा देण्यासाठी घेतल्या जात आहेत.

error: Content is protected !!