मराठी कृषी कॉलेजच्या कृषी दुतांकडून यशस्वी आयोजन
फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ दापोली संचलित ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविदयालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषीदुतांकडून कृषी मेळावा आणि पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कृषीदुतांनी ‘आपली शेती, आपली माती आणि आपली संस्कृती’ यांच्या सन्मानासाठी हा मेळावा भरवला होता तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, सेंद्रिय शेती विषयी मार्गदर्शन, शेतीस उपयुक्त असणारी सर्व वाहने व अवजारे यांच्याविषयी प्रदर्शन ठेवले होते, त्याची माहिती दिली गेली. रानभाज्यांपासुन बनवलेले विविध पदार्थ घेवून महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमास कै.राजाराम मराठे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीमती ढोले, कार्यक्रम समन्वयक श्री. चव्हाण, श्री. बगाडे, भिरवंडे मराठी शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ घाडीगावकर, संजना चिंदरकर, श्रीमती बगळे, गावचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश घाडीगावकर, मंगेश सावंत, सुरेन्द्र सावंत, बालकृष्ण सावंत, प्रसाद सावंत तसेच शेतकऱ्यांची, महिलांची व विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.
हा कार्यक्रम हर्षद मिटके, प्रसाद पाटील, राकेश आसणेकर, विजय नाईक, निखिल अनूसे, समर्थ वरूटे, योगेश हाके, संकेत आरडे, सुचित पाटील, अर्जुन सुर्यवंशी या कृषीदुतांनी पार पाडला. यांना महाविदयालयाचे प्राचार्य श्री. संते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.












