जिल्हानियोजन मधून ५० लाख रुपये निधी मंजूर
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून व खारेपाटण माजी सरपंच व भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमाकांत राऊत यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या खारेपाटण हसोळटेंब कोंडवाडी या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ आज रविवार दि.१ नोव्हेंबर २०२६ रोजी कणकवली तालुका भाजप अध्यक्ष श्री दिलीप तळेकर यांच्या प्रमुख उपस्थित श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाला खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, शिंदे शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव, सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये, भाजप महिला कार्यकर्त्या सौ उज्ज्वला चिके, तळेरे शक्ती केंद्र प्रमुख शैलेश सुर्वे, तळेरे माजी सरपंच दिनेश मुद्स, भाजप कार्यकर्ते बारस्कर, बूथ अध्यक्ष शेखर शिंदे, विजय सावंत, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुहास राऊत, राकेश राऊत,बब्या खांडेकर, प्रकाश आडवीलकर,सौरभ धालवपकर,सत्यवान खांडेकर,ऋषी राऊत आदी मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
खारेपाटण हसोळटेंब कोंडवाडी हा रस्ता सध्या खराब झाला आहे.तर येथे असणारा चढाव हा धोकादायक असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.याकरिता खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी सातत्याने पाठ पुरावा करून हा रस्ता मंजूर करून घेतला. असून या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन फंडातून सुमारे ५० लाख रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे. यामधून सदर रस्त्याचे कटिंग करून चढ कमी करण्यात येणार आहे व रस्त्याच्या बाजूला संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. तसेच माती भराव व मोऱ्या टाकण्यात येणार असून हा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी सदर रस्त्यासाठी मंजूर केल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थानी आभार व समाधान व्यक्त केले.












