वैभववाडी येथे ८ ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती जमातीसाठी उद्योजकता विकास कार्यक्रम

वैभववाडी (प्रतिनिधी) : बुद्धिस्ट आंत्रप्रेन्यूअर्स असोसिएशन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (BEACI), सिंधुदुर्ग, संघटनेमार्फत अनुसूचित जाती/ जमाती व महिला  इच्छुक उद्योजकांसाठी ‘उद्योजकता विकास कार्यक्रम’ दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील तरुण तरुणींना नवीन व्यवसायासाठी मार्गदर्शन करणे, त्यांना सरकारी योजनांची माहिती देणे आणि त्यांच्या उद्योजकतेला चालना देणे हा आहे. या कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्र, ओरोस, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन (NSIC), महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, बँकेचे अधिकारी आणि इतर विविध सरकारी विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नव उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. बँकेकडून कर्ज मिळवण्याबाबत सखोल मार्गदर्शन. यशस्वी उद्योजकांकडून प्रेरणा आणि अनुभव. शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, याची माहिती देण्यात येणार आहे. तरी, तालुक्यातील अनुसूचित जाती/ जमातीच्या व इतर सर्व बेरोजगार युवक-युवती व महिलांना या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक: बीई. ॲड. विशाल जाधव अध्यक्ष – सिंधुदुर्ग जिल्हा BEACI बीई. हर्षवर्धन बोरवडेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!