खारेपाटण (प्रतिनिधी) : श्रावण महिन्यातील पवित्र असा नारळी पौर्णिमा सण कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावात पारंपरिक पद्धतीने आनंदी व उत्साहाच्या वातरणात सर्व ग्रामस्थानी एकत्र येत साजरा केला. यावेळी संपूर्ण खारेपाटण गावात सकाळ पासूनच नारळ लढविण्याच्या छोट्या मोठ्या स्पर्धा खेळण्यात आल्या. यांमध्ये लहान मुलांपासून तरुण तरुणी व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेत नारळी पौर्णिमेचा आनंद लुटला. यावेळी खारेपाटण गावातील प्रतिष्ठित नागरिक व श्री देव काळभैरव – दुर्गादेवी ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर शेठ गुरव यांच्या शुभहस्ते नारळ लढविणे स्पर्धांना सुरवात करण्यात आली.
यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सोसायटीचे संचालक विजय देसाई, सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई, मंगेश गुरव, संतोष पाटणकर, भाऊ राणे, नंदकिशोर कोरगावकर, महेश कोळसुळकर, संकेत शेट्ये, तुषार कोळसुलकर, संकेत लोकरे, ज्येष्ठ ग्रामस्थ विठ्ठल गुरव, विजय राणे आदी मान्यवर उपस्थित होते. तर सायंकाळी खारेपाटण ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक नारळी पौर्णिमा उस्तव साजरा करत गावचे खोत यांच्या प्रमुख उपस्थित मानाचा नारळ खारेपाटण येथील शुक नदीत अर्पण करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.












