खारेपाटण (प्रतिनिधी) : आपण सर्वजण शाळेत असताना भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत…ही प्रतिज्ञा म्हणालो आहोत. रक्षाबंधनाचा सण हा भावाबहिणीच्या नात्याचे प्रतीक मानला जातो. हा सण सामाजिक जाणीवेने साजरा करत श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात आश्रय घेतलेल्या निराधार वंचित बांधवांसमवेत रक्षाबंधन उत्साहात साजरा केला.आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, या प्रतिज्ञेमागील भावना प्रत्यक्षात आमलात आणली.
या उपक्रमाचे आयोजन कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) अंतर्गत करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आश्रमातील बांधवांच्या मनात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांना राख्या बांधल्या व मिठाई वाटप केले आणि स्नेहमिलनाचा आनंद लुटला. या कार्यक्रम प्रसंगी शैलेन्द्र कदम यांनी जीवन आनंद संस्थेच्या कार्याची उपस्थितांना माहिती दिली.पुष्पसेन काॅलेजचे प्रा. महादेव परब यांनी विद्यार्थ्यांना कुटुंब आणि समाजातील जेष्ठ नागरिकांचे महत्व नसमजावून सांगितले. तर कार्यक्रम संयोजनात कॉलेजचे प्रा. महादेव परब, प्रा. ठाकूर, NSS युनिट यान्चेसह संविता आश्रमाचे स्वयंसेवक शैलेन्द्र कदम यांची विशेष भुमिका राहिली. तसेच संविता आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी विद्यार्थ्यांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले.












