पालकमंत्री नितेश राणे यांची दक्षता; स्वातंत्र्य दिनी होणारे उपोषण, आंदोलन स्थगित

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जनतेच्या विविध समस्यांबाबत १५ ऑगस्ट रोजी उपोषण, आंदोलन करणार असल्याची १११ निवेदने जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. या अनुषंगाने आज पालकमंत्री नितेश राणे यांनी उपोषणकर्त्यांची बैठक आयोजित करून त्यांच्या समस्या सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. त्यांच्या समस्याकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याने आपल्या समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी आंदोलन करणार असल्याच्या नोटिसा जिल्हा प्रशासनाकडे दिल्या होत्या. याची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व आंदोलन कर्त्यांना निमंत्रित करीत त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या व संबंधित अधिकाऱ्याला समोर घेत त्यांची समस्या सोडविण्याबाबत योग्य ते निर्देश दिले. जेणेकरून १५ ऑगस्ट रोजी कोणीही आपल्या समस्यासाठी उपोषण अथवा आंदोलन करु नये यासाठी प्रयत्न केले.

यावेळी अनेक ग्रामस्थांचे समाधान झाल्याने १५ ऑगस्ट रोजी होणारी आंदोलने, उपोषनांची संख्या कमी करण्यात यश आले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधिक्षक मोहन दहिकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या आजच्या या बैठकिला मोठ्या संखेने नागरिक आपल्या समस्या घेऊन आले होते. सायंकाळी उशीरा पर्यंत ही बैठक सुरु होती. पालकमंत्री राणे यांनी ज्या तक्रारी तात्काळ सूटण्यायोग्य होत्या त्यां तात्काळ सोडविल्या तर काही तक्रारी बाबत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती चौकशी करून त्या सोडविण्याचे आदेश दिले.

error: Content is protected !!