देशभक्तीपर समूहगीत गायन अन् रांगोळी स्पर्धा आयोजन !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आर्ट्स, कॉमर्स, व्होकेशनल अँड सायन्स फोंडाघाट मध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद पारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच ज्या क्रांतिकारकांच्या त्याग व बलिदानामुळे भारत मातेला स्वातंत्र्य मिळाले त्यांना वंदन केले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व देशभक्तीची भावना वृद्धींगत व्हावी यासाठी प्रशालेमध्ये देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे जेष्ठ संचालक व उद्योजक संजय आग्रे यांनी आपले वडील कै. वसंत आग्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कृत केल्या होत्या. या स्पर्धेला संगीत साथ ओम गोसावी, हिमांशू सावंत, संदीप पाताडे, भावेश गुरव या विद्यार्थ्यांनी केली. या स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे.
समूहगीत गायन स्पर्धा:-
I)प्राथमिक गट:-
1) प्रथम क्रमांक- पाचवी-अ
2)द्वितीय क्रमांक- सातवी-अ
3)तृतीय क्रमांक- सहावी-अ
II)माध्यमिक गट
1)प्रथम क्रमांक- आठवी-ब
2)द्वितीय क्रमांक- दहावी-अ
3)तृतीय क्रमांक- नववी-अ
III)उच्च माध्यमिक गट
1)प्रथम क्र.- बारावी-सायन्स
2)द्वितीय क्र.- अकरावी-सायन्स
3)तृतीय क्र.- बारावी-कला
रांगोळी स्पर्धा:-
I)प्राथमिक गट
1) प्रथम क्र.- दिया विठ्ठल सावंत व कु. रावी विनायक सावंत
2) द्वितीय क्र.- वरूण दत्तकुमार देसाई व कु. मृणाल किशोर सामंत
3)तृतीय क्र.- चित्रा संजय नानचे व कु.गौरी अशोक नानचे
माध्यमिक गट
1) प्रथम क्र. – कादंबरी जगदीश ताईशेटे व कु.याज्ञीका महेश हळदिवे
2) द्वितीय क्र. – राशी हेमंत म्हापसेकर व कु. लक्ष्मी विजय कसवणकर
3)तृतीय – अथर्व अनंत वर्दम व कु. दिव्या विजय लाड

या सर्व स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाच्याअध्यक्षस्थानी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन म. ज. सावंत, यामिनी आग्रे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद पारकर, पर्यवेक्षक व्ही. पी.राठोड, ज्युनिअर कॉलेज व्यवस्थापक डी.बी.फड, शिक्षिका रेवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. वरील सर्व विजेत्या स्पर्धकांचा व संघाचा मान्यवरांच्या हस्ते मेडल्स, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. यामिनी आग्रे यांनी कलेची आवड निर्माण करण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या असून विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पाहिजे त्यातून आपल्या आवडी जोपासता येतात. असे विचार व्यक्त केले. तसेच विजेत्या संघांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन अयशस्वी विद्यार्थ्यांनी निराश न होता पुढील स्पर्धेत जोमाने प्रयत्न करावेत असे आवाहन यामिनी आग्रे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष चेअरमन म.ज. सावंत यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा व कलेची जोपासना करावी असे विचार आपल्या अध्यक्षीय मनोगततून व्यक्त केले.
या स्पर्धांच्या यशस्वीतेसठी शिक्षक नानचे, शिक्षक गोसावी यांचेसह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले. शिक्षक गांगुर्डे, शिक्षक वाळवे, शिक्षक नेवरेकर, यांनी परीक्षण केले. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रसाद पारकर यांनी, सूत्रसंचालन शिक्षक जोईल यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार शिक्षक फड यांनी मानले.













