कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायत उपसरपंच पदी बाबला गोसावी यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नुकतीच ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य बाबला गणपत गोसावी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतीचे उपसरपंच बबलू पवार हे गेली अडीज वर्षे उपसरपंच म्हणून पदावर कार्यरत होते.त्यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.त्यानंतर रिक्त झालेल्या पदावर निवड करण्यासाठी सरपंच संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांच्या अध्यक्षतेखाली ११ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सभा संपन्न झाली. या सभेत बाबला गोसावी यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच बाबला गोसावी यांचे ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले. यावेळी सरपंच पप्पू ब्रम्हदंडे माजी उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य बबलू पवार, रवींद्र पवार, विशाखा राऊत, अक्षदा सादीकले, स्नेहा गोसावी, सारिका कुडाळकर व ग्राम विकास अधिकारी गिरीश धुमाळे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!