संस्थेची अमृतमहोत्सवी वर्षाकडे होणारी वाटचाल अभिमानास्पद
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिंमिटेड खारेपाटण या संस्थेला ७० वर्षं पूर्ण झाली असून अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारी ग्रामीण भागातील ही महत्त्वाची शेतकरी संस्था असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे भावपूर्ण उदगार संस्थेचे चेअरमन रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी खारेपाटण सोसायटीच्या ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना काढले.
खारेपाटण सोसायटीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या संस्थेच्या वार्षिक सभेला संस्थेचे उपाध्यक्ष एकनाथ कोकाटे, संचालक सुरेंद्र कोरगावकर, विजय देसाई, इस्माईल मुकादम, श्रीधर गुरव, तृप्ती माळवदे, उज्ज्वला चिके, मंगेश गुरव, रघुनाथ राणे, अशोक पाटील, मोहन पगारे, रवींद्र शेट्ये, संदेश धुमाळे, संस्थेचे कार्यालक्षी संचालक व सचिव अतुल कर्ले यांसह खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, प. पू. भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र ब्रम्हदंडे, संचालक संतोष पाटणकर, नंदकिशोर कोरगावकर, संस्थेचे सचिव शुभम मोरे, ग्रा. पं. सदस्य जयदीप देसाई, खारेपाटण रोटरी क्लबचे अध्यक्ष दयानंद कोकाटे, खारेपाटण हायस्कूल मुख्याध्यापक संजय सानप, महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या गौरी शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या वतीने खारेपाटण पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. तर आदर्श शेतकरी म्हणून कुणकवण येथील युवा प्रगतशील शेतकरी आणी संस्थेचे सभासद जितेंद्र बाबाजी कदम यांची निवड झाल्याबद्दल तसेच राजेंद्र ब्रम्हदंडे यांनी आपल्या दिवंगत पत्नीचे अवयव दान करून समाजाला एक वेगळा आदर्श घालून दिल्याबद्दल या दोन्ही महनीय व्यक्तीचा संस्थेचे अध्यक्ष रवींद्र जठार यांच्या शुभस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन विशेष गौरव कारण्यात आला.
संस्थेचे सचिव अतुल कर्ले यांनी सभेला रीतसर सुरवात करून अहवाल वाचन केले. यावेळी बोलताना अध्यक्ष श्री. जठार म्हणाले सभासदाच्या पाठिंब्यावरच संस्थेने आजपर्यंत उच्चतम अशी प्रगती केलेली असून पुढील काळात बचत गटाच्या महिला कार्यकर्त्यांना मेळावे घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर किशोर वयीन मुलीसाठी आरोग्य शिबीर देखील राबविण्यात येणार असल्याची माहिती सोसायटीच्या वार्षिक सभेत अध्यक्ष रवींद्र जठार यांनी दिली. या सभेचे सूत्रसंचलन एकनाथ कोकाटे केले. तर सर्वांचे आभार विजय देसाई यांनी मानले.










