पालकमंत्री नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1.25 वाजता दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आगमन व बैठकीस उपस्थिती. (स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस). सायं. 5 वाजता भारतीय जनता पक्ष ओरोस कार्यालय, येथे पदाधिकाऱ्यांसह बैठकीस उपस्थिती.

error: Content is protected !!