कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील “क्ष ” किरण वैद्यकीय अधिकारी अशोक नारकर यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त 30 ऑगस्ट रोजी मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे सकाळी 9 ते दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशोक नारकर मित्रपरिवार, सिंधरक्तमित्र प्रतिष्ठान शाखा कणकवली आणि उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील क्ष किरण वैद्यकीय अधिकारी अशोक नारकर यांचा वाढदिवस नेहमी रक्तदान तसेच अन्य सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. यावर्षी नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी सहभागी होत उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
” क्ष ” किरण वैद्यकीय अधिकारी अशोक नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन










