मंगेश गुरव यांची शिवसेना कणकवली तालुका प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावचे रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते मंगेश गुरव यांची नुकतीच शिवसेना पक्ष कणकवली तालुका प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा खारेपाटण येथे मान्यवर मित्रमंडळींच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीचे पदाधिकारी व खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, तालुका समितीचे खजिनदार व शिक्षण संस्थेचे सचिव महेश कोळसुलकर,खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीचे सचिव व सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, खारेपाटण शिक्षण संस्थेचे संचालक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए डी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

“शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पक्षाचे वरिष्ठ नेते व मार्गदर्शक श्री संजयजी आंग्रे, आमदार किरण उर्फ भैया सामंत आमदार निलेश राणे यांनी माझ्यावर विश्वास टाकून पक्ष संघटनेच्या कणकवली तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. असे मंगेश गुरव यांनी यावेळी सांगितले तर आपल्याला दिलेल्या पदला पुरेपूर न्याय देण्याचे काम करण्याबरोबर खारेपाटण विभागातील जनतेची विकास कामे करण्यासाठी भर देण्यात येईल असे देखील सांगितले. यावेळी खारेपाटण तालुका कृती समितीच्या वतीने व मित्र मंडळींच्या वतीने मंगेश गुरव यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!