मटका गोडाऊनवर कारवाई, १२ जणांवर गुन्हा दाखल

२.७८ लाखांची रोकड जप्त

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बाजारपेठेतील मटका व्यवसायिक महादेव घेवारे यांच्या गोडाऊनवर पालकमंत्री नीतेश राणे यांनी थेट धाड घातल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर कणकवली पोलिसांनी तब्बल १२ जणांवर गुन्हा दाखल करत २ लाख ७८ हजार ७२५ रुपयांची रोकड जप्त केली आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये महादेव रामकांत घेवारी (६५, रा. कणकवली बाजारपेठ), रवींद्र श्रीपत चव्हाण (४४, रा. कणकवली टेंबवाडी), मयुर मनोहर पांडव (३० रा. जानवली-वाकाडवाडी), संदीप शंकर पडवळ (४६, रा. कणकवली, कनकनगर), चंद्रकांत शंकर गवाणकर (57, कणकवली – परबवाडी), प्रशांत शशिकांत घाडीगावकर (४6, रा. वरवडे), महेश आत्माराम बाणे (२७, रा. कणकवली, मधलीवाडी), अनिल श्रीपत पाष्टे (48, कलमठ लांजेवाडी), सतीश विष्णू गावडे (40, वागदे गावठणवाडी), संतोष शंकर राठोड (43, कलमठ-गावडेवाडी) तुषार यशवंत जाधव (42, वागदे – सावरवाडी), महेंद्र चंद्रकांत देवणे (35, कणकवली बाजारपेठ) यांचा समावेश आहे.

दरम्यान सदर आरोपींवर नेमका कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल होतो, कोणती कलमे लावली जाणार याबाबात पोलीस अधिकाऱ्यांमध्ये सध्या विचार विनिमय सुरु आहे.

error: Content is protected !!