फोंडाघाट येथे कृषीदुतांकडून कृषी मेळावा व रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन

‘आपली शेती – आपली संस्कृती’ या संकल्पनेतून कृषीदुतांचा उपक्रम

कृषी महाविद्यालय फोंडाघाटतर्फे आधुनिक तंत्रज्ञान व सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन

रानभाजी पाककला स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

कणकवली (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ दापोली संचलित ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषि महाविदयालय फोंडाघाट येथील कृषि पदवीच्या अंतिम वर्षातील कृषिदुतांकडून कृषी मेळावा आणि रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन, डाॅ. एम. एस. स्वामिनाथन यांची जन्म शताब्दी निमित्त त्यांचे पूजन व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कृषिदुतांनी आपली शेती, आपली माती आणि आपली संस्कृती यांच्या सन्मानासाठी हा मेळावा भरवला होता, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, सेंद्रिय शेती विषयी मार्गदर्शन, शेतीस उपयुक्त असणारी सर्व वाहने व अवजारे यांच्या विषयी प्रदर्शन ठेवले होते त्याची माहिती दिली गेली. रानभाज्यांपासुन बनवलेले विविध पदार्थ घेवून महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

या कार्यक्रमास कै. राजाराम मराठे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका कदम, कार्यक्रम समन्वयक चव्हाण, बगाडे, जोशी, देसाई मॅडम आणी जाणवली गावचे सरपंच अजित पवार, जानवली गावचे उपसरपंच किशोर राणे, अर्चना लाड ग्रामसेवक जानवली, हूंबरट गावचा सरपंच मनिषा गुरव, कृषि सहाय्यक पी.पी. तांबे

हा कार्यक्रम राहुल डिगे, अथर्व भोवर, अतुल सी. ए., अभिनव पी.सी., सार्थक डोणे, प्रथमेश परब, देवराज निंबाळकर, सिध्देश पताडे, ओम भांगरे, जितेंद्र पावरा, हर्षद गायकवाड, प्रतिक लोखंडे, सुमेधबोधी गोंगले, स्वराज लामखडे, तेजस तिकुटे, चेतन गाडे, या कृषीदुतांनी पार पाडला. यांना महाविदयालयाचे प्राचार्य संते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!