देवगड (प्रतिनिधी) : कुणकवण (ता. देवगड) गावचे प्रभारी सरपंच आणि प्रगतशील शेतकरी जितेंद्र बाबाजी कदम यांना खारेपाटण गट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा सन 2024-2025 मधील यशस्वी आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. याबद्दल जितेंद्र कदम यांचे कुणकवण ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
कुणकवण गावचे सुपूत्र आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी अण्णा तावडे ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून शेतीसाठी धरणातून मुबलक पाणी उपलब्ध करून दिल्यामुळेच आपण शेती करत असल्याचे जितेंद्र कदम यांनी सांगितले.










