महेश बांदिवडेकर यांची निवड
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील चिंचवली या गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी येथील ग्रामस्थ महेश बांदिवडेकर यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
चिंचवली ग्रामपंचायतीची जनरल सभा नुकतीच सरपंच अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली. यावेळी गावच्या ताणतमुक्ती समिती अध्यक्षपदी महेश बांदिवडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेत ग्रामस्थ सुनील नाना भालेकर यांनी अध्यक्ष नावाचा सूचक प्रस्ताव मांडला तर सूर्यकांत भालेकर यांनी त्याला अनुमोदन दिले. महेश बांदिवडेकर यांनी यापूर्वी देखील अध्यक्ष काळात तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून गावात शांतता व कायदा सुव्यस्था चोख राहण्यासाठी प्रयत्न केले आहेत.










