देवगड (प्रतिनिधी) : गोविंद गणू घाडी जामसंडेकर (84) मुंबई (किंजवडे ) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे सोमवारी दुपारी निधन झाले.
गोविंद गणू घाडी हे अपना बँकचे माजी संचालक होते. तसेच किंजवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेचे गेली 30 वर्षे अध्यक्ष होते. ते नेहमी विविध सामाजिक कार्यात सहभागी होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे तसेच गावातील एकत्र कुटुंबातील नातलग आहेत.










