भाजप बूथ अध्यक्षांच्या वतीने सत्कार
खारेपाटण (प्रतिनिधी) ::सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सन – २०२५ ते २०२८ या तीन वर्षाच्या कालावधी करीता जिल्ह्यात पक्ष संघटना बांधणीसाठी नवीन कार्यकर्त्यांच्या निवडी जाहीर केल्या असून खारेपाटण येथील भाजपाच्या महिला कार्यकर्त्या तसेच खारेपाटण गावच्या अँग्री यंग वूमन सरपंच सौ प्राची देवानंद ईसवलकर यांची नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.तर नुकताच त्यांचा खारेपाटण ग्रामपंचायत येथे भाजप बूथ अध्यक्षांच्या वतीने सत्कार करण्यात आला./सिंधुदुर्ग जिल्हा भाजप अध्यक्ष श्री प्रभाकर सावंत यांच्या स्वाक्षरीने भाजप जिल्हा सरचिटणीस पदाचे लेखी नियुक्ती पत्र नुकतेच खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांना देण्यात आले.
तर त्यांच्या या निवडी बद्दल भाजपा तालुका अध्यक्ष श्री दिलीप तळेकर, माजी जि.प.सदस्य श्री बाळा जठार खारेपाटण माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी दूरध्वनी द्वारे त्यांचे अभिनंदन करून शुभेछा दिल्या आहेत.
खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालय येथे नुकताच सरपंच सौ प्राची ईसवलकर यांचा उपसरपंच व बूथ अध्यक्ष श्री महेंद्र गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी बूथ अध्यक्ष श्री शेखर शिंदे,श्री शेखर कांबळी,श्री इस्माईल मुकादम,विजय सावंत आदी मान्यवर उपस्थित या सर्वांनी मिळून नूतन भाजप जिल्हा सरचिटणीस श्रीम.प्राची ईसवलकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी आपली प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित भाजपा जिल्हा सरचिटणीस सौ प्राची ईसवलकर म्हणाल्या “भारतीय जनता पार्टीने माझ्यावर दिलेली जबाबदारी पूर्ण पणे संभाळून त्या पदाला न्याय देण्याचे काम निश्चित करेन.तसेच सरपंच या नात्याने गावच्या विकासाबरोबरच पक्ष वाडीच्या दृष्टीने पक्षाची संघटनात्म बांधणी करण्यासाठी महिलांमध्ये व सर्वं सामान्य जनतेमध्ये जाऊन व सर्व सहकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन समाजोपयोगी कामे करून पक्ष वाढीसाठी प्रामाणिक पणे काम करणार असल्याचे सांगितल










