नवीन कुर्ली गावातील बंद पडत आलेली स्ट्रीट लाईट पुन्हा सुरू

माजी सभापती मनोज रावराणे यांनी स्वखर्चातून केली मदत

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गणपतीचा सण तोंडावर असताना नवीन कुर्ली गावातील स्ट्रीट लाईटचे दिवे बरेच दिवस बंद होते. नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब माजी सभापती मनोज रावराणे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी तातडीने मनोज रावराणे यांनी स्वखर्चातून ५५ पथदिवे दिले. ते नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ आणि नवदुर्गा युवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः गावात फिरून लावून घेतले.

ऐन गणपतीच्या सनावेळी स्ट्रीट लाईट सुरू झाल्यामुळे नवीन कुर्ली ग्रामस्थांकडून मनोज रावराणे यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. नवीन कुर्लीतील सर्व रस्ते प्रकाशमय झाल्याने नवीन कुर्ली ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे आणि स्तुत्य कामगिरीचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे.

error: Content is protected !!