जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धेत वल्लरी राणेचे सुयश

कणकवली (प्रतिनिधी) : आयडियल इंग्लिश स्कुल ॲण्ड ज्यु. कॉलेज, वरवडे आणि डॉ. राज अहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट, हरकुळ बु || आयोजित जिल्हास्तरीय सुगम संगीत “श्रावणधारा” स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेची विद्यार्थीनी कु. वल्लरी निलेश राणे यीने जिल्हास्तरीय गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत सुयश संपादन केले.

वल्लरीला गायनाची आवड असून लहानपणापासून गायनाचे धडे ती तीच्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली गिरवत आहे व त्याचा सराव करीत आहे. शालेय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये तीचा नेहमीच सहभाग असून तीला वाचन व लेखनाची आवड आहे.

तीच्या या सुयशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, शालेय समिती चेअरमन आर.एच.सावंत तसेच सर्व संस्था, शालेय समिती पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक बयाजी बुराण, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि संगीत प्रेमींनी तीचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!