फक्त 12 महिन्यांच्या ठेवीवर सव्वा दहा टक्के व्याज ! जेष्ठ नागरिकांसाठी पाव टक्के जादा व्याज !

वैश्य समाज पतसंस्थेची लंबोदर ठेव योजना ग्राहकांसाठी मोठे आकर्षण

31 ऑक्टोबरपर्यंत स्कीम उपलब्ध

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट ने ग्राहकांसाठी लंबोदर ठेव योजना ही विशेष स्कीम आणली असून यामध्ये 12 महिने मुदतीच्या ठेवीवर 10.25 % व्याजदर मिळणार आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना पाव टक्के जादा व्याज दर दिला जाणार आहे. वैश्य समाज पतसंस्थेच्या वतीने गणेशचतुर्थी निमित्त लंबोदर ठेव ही विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. केवळ 12 महिन्यांच्या ठेवीवर सव्वा दहा टक्के व्याजदर देणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बँकिंग क्षेत्रातील ही एकमेव योजना आहे. ही योजना मर्यादित कालावधीसाठी असून 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत या योजनेचा लाभ ग्राहक घेऊ शकतात. 31 ऑक्टोबरपर्यंत मर्यादित कालावधी साठी असलेल्या लंबोदर ठेव योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन वैश्य समाज पतसंस्थेचे चेअरमन गणपत वळंजू , मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर आणि सर्व संचालक कमिटी ने केले आहे. लंबोदर योजनेची अधिक माहिती आणि गुंतवणूक करण्यासाठी वैश्य समाज पतसंस्थेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!