वैभववाडी तालुक्यात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील गावागावात दीड दिवसाच्या गणपतीचे मोठया भक्ती भावाने व भावपुर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बापा मोरया! मंगल मूर्ती मोरया!! पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात सायंकाळी गावागावातील नदी किनारी गणपती घाटावर विसर्जन करण्यात आले. गेले दोन दिवस जोरदार पाऊस पडत असल्यामुळे गणेश भक्तांचा हिरमोड झाला आहे.

कोकणात घरगुती गणपतीची मोठी परंपरा आहे. प्रत्येक घरात गणपतीची प्रतिष्ठापणा केली जाते. घरगुती गणपतीचे दीड दिवस, पाच दिवस गौरी गणपती विसर्जन व अकराव्या दिवशी अनंत चतुर्थी दिवशी विसर्जन करतात. दीड दिवसाने विसर्जन हे वैयक्तिक कारणामुळे घरगुती गणपती विसर्जन करतात. मात्र सार्वजनिक गणपती अनंतचतुर्थीला अकराव्या दिवशीच विसर्जन करतात. गुरुवारी दीड दिवसच्या गणपतीचे विसर्जन तालुक्यातील गावागावात गणपती घाटावर विसर्जन करण्यात आले.

यावेळी पूजा अर्चा, आरती, भजन, करीत गणपती बाप्पाला नवस बोलत पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करीत भावपुर्ण वातावरणात जड अंतकरणाने निरोप दिला.

error: Content is protected !!