खारेपाटण येथे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पावसाचे तुडुंब पाणी..

महामार्गाशी सलग्न नाले व मोरींची डागडुजी न केल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवर

प्राधिकरणाचे दुर्लक्ष….

खारेपाटण (प्रतिनिधी) : गेली दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन थोडे विस्कळीत झाले असून या पावसाचा फटका खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ ला बसला असून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने पूर्ण पावसाचे पाणी महार्गावरच साठून तुडूंब झाले असून त्याला नैसर्गिक तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. यांबाबत अधिक वृत्त असे की, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पावसाच्या पूर्वी येथील महामार्गाशी संलग्न असलेल्या नाले वहाळ व मोरी यांच्या योग्य साफ सफाई व दुरुस्ती न केल्यामुळे ऐन पावसाळ्यात अशा प्रकारे पावसाचे पाणी थेट महामार्गावर येऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तर या परिस्थिती वाहने देखील सदर पाण्यातून वाट काढत भरधाव वेगाने जात असून यामुळे एखादा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.तर हायवे प्राधिकरणाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सवाल आता ग्रामस्थमधून व्यक्त केला जात आहे. दरम्यान खारेपाटण येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय असून येथील अधिकारी मुंग गिळून गप्प आहेत. तर मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गाच्या प्राधिकरणाच्या वतीने महामार्गाशी संलग्न असलेली बरीचशी कामे अपूर्ण ठेवलेली असून नागरिकामधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!