श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून राबविणार समाजपयोगी उपक्रम

ट्रस्टची नूतन कार्यकारणी जाहीर; संस्थापक अध्यक्षपदी सचिन लोके यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : असलदे येथील स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्टची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून संस्थापक अध्यक्ष म्हणून सचिन लोके यांची निवड करण्यात आली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट या संस्थेचे प्रेरणास्थान व सल्लागार नंदकुमार पेडणेकर यांनी सदरची माहिती दिली. यावेळी श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील मठात जाऊन समस्त कार्यकारिणीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेतला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संस्थापक सचिन लोके, संस्थापक सचिव प्रशांत साटम, संस्थापक खजिनदार ज्योती जाधव, प्रकाश जोईल, प्रकाश पावसकर, मधुसूदन भडसाळे, तात्या निकम आदी विश्वस्त उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे नूतन संस्थापक अध्यक्ष आणि विश्वस्त यांचे अभिनंदन करण्यात आले. श्री स्वामी समर्थ महाराज सेवा ट्रस्ट नूतन संस्थेचे विश्वस्त यांनी माहिती देताना सांगितले, की या संस्थेतील सर्व पदाधिकारी संस्था स्थापन होण्याआधी सामाजिक क्षेत्रात उत्तम सेवा कार्य करत होते. पण या क्षेत्रात कार्य करीत असताना काही बंधने येत होती म्हणून सर्वानुमते श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून प्रथम अन्नदानाचा कार्यक्रम वृद्धाश्रम येथे करण्यात आला. तसेच यापुढे ट्रस्टच्या वतीने वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम स्थापन करण्याचा मानस विचाराधीन असल्याचे विश्वस्तांकडून सांगण्यात आले.

error: Content is protected !!