शिक्षक दिनानिमित्त जनजागृती सेवा संस्था, ठाणे मार्फत खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमधील प्राध्यापकांचा सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : जनजागृती सेवा संस्था (रजि.), ठाणे या सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योगश्री प्र. ल. पाटील ज्युनियर कॉलेज खारेपाटण येथील प्राध्यापकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जनजागृती सेवा संस्था, ठाणेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, खजिनदार दत्ता कडूलकर, सेवानिवृत्त शिक्षक भास्कर गुरसाळे, कलादिग्दर्शक आणि गायक शशिकांत कांबळी उपस्थित होते. यावेळी बोलताना गुरुनाथ तिरपणकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

सन २०२१ रोजी स्थापन झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. विविध सेवाभावी संस्थांना आर्थिक मदतीचा हात नेहमीच या संस्थेच्या माध्यमातून दिला जातो. कोरोना काळात गरजू कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात जनजागृती सेवा मंडळ मार्फत देण्यात आला. संस्थेच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये ज्युनिअर कॉलेज खारेपाटणचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सहाय्यक शिक्षक अजय गुरसाळे, दयानंद कोकाटे, अंकुश नाईक, संगाप्पा गुरव, सुरेश करांडे, रामचंद्र लोके, नितीन वरुणकर, भोलेनाथ कानागल, सुबोध देसाई, दिगंबर गुरखे, दीक्षा गुरखे, सारिका महिंद्रे, तबसूम काझी, दर्शना पाताडे, गौरी सारंगे, श्रुतिका जांभेकर, सायली पालव आणि सेट परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केल्याबद्दल ऋषिकेश सानप यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, संचालक विजय देसाई, सिनिअर कॉलेज प्राचार्य श्री. कांबळे, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

जनजागृती सेवा संस्थेच्या अभिनव उपक्रमाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!