शॉक लागून मृत पावलेल्या बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांना हायवे कंपनीकडून अर्ज लाख रुपयांची नुकसान भरपाई

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून नगरसेवक शिशिर परुळेकर, मेघा सावंत यांचा पाठपुरावा

कणकवली (प्रतिनिधी) : हायवे ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे विद्युत पोलाचा शॉक लागून मृत्यू झालेल्या बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांना हायवे ठेकेदार कंपनीकडून अडीच लाख रुपयांची नुकसान भरपाई अदा करण्यात आली. याकरिता नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून नगरसेवक शिशिर परुळेकर, मेघा सावंत, महेश सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी याकरिता सातत्याने पाठपुरावा केला. नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका मेघा सावंत, महेश सावंत, किशोर राणे यांनी या रक्कमेचा धनादेश श्रीमती सुहासिनी तावडे यांना सुपूर्द केला. या प्रसंगी कुटुंबीयांनी सर्वांचे आभार मानले. शिशिर परुळेकर यांचे कुटुंबीयांनी विशेष आभार मानत, नगराध्यक्ष आणि टीमला धन्यवाद देत समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!