विद्यामंदिर हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक अरविंद बोरकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील टेंबवाडी येथील रहिवासी व कणकवली विद्यामंदिर हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक अरविंद दत्तात्रय बोरकर (वय 75) यांचे वृद्धापकाळाने आज मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी 4 वाजता येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बोरकर सर या नावाने ते कणकवली परिचित होते. कणकवली शहरातील अनेक पिढ्या त्यांनी विद्यामंदिर हायस्कूल मधून घडवल्या होत्या. कणकवली नगरपंचायत मधील भाजपाचे नगरसेवक शिशिर परुळेकर यांचे ते सासरे होत.

error: Content is protected !!