घोणसरी ग्रामपंचायत वेबसाईट चे लोकार्पण

कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या पार्श्वभूमीवर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून लोकाभिमुख प्रशासन अंतर्गत कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत घोणसरी येथे ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळाचे (वेबसाईटचे) अनावरण करण्यात आले.

प्रशासकीय काम अधिक सुलभतेने लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ग्रामपंचायतची वेबसाइट नव्या रूपात दिसणार आहे. नव्या वेबसाइटवर शासनाच्या योजना, ग्रामपंचायत स्तरावरील माहिती, सर्व सेवा ऑनलाईन, जमा खर्च, गावातील सुरू असलेली व पूर्ण झालेली विकासकामे, गावातील पर्यटन संदर्भातील माहिती, तसेच ग्रामस्थांसाठी अधिक चांगले फिचर्स यामध्ये असणार आहेत.

सदर कार्यक्रमासाठी सरपंच प्रसाद राणे, ग्रामपंचायत सदस्य दिप्ती कारेकर, सुप्रिया आचरेकर, प्राची राणे, सचिन सुतार, सतीश जाधव, अंकिता परब, ऐश्वर्या सावंत, महेश येंंडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अशोक राणे, पोलिस पाटील भालचंद्र राणे, तलाठी श्री.शिंदे, माजी सरपंच विलास मराठे, सर्व बचत गट अध्यक्ष, सचिव, सदस्य, सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, आरोग्य कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी, विविध खात्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश गोसावी यांनी मानले.

error: Content is protected !!