करवीर निवासिनी महालक्ष्मी आई अंबाबाई भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर अवतार धारण केलेल्या नंदकन्या नंदादेवी या रूपात सजली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऑक्टोबर 2026 शारदीय नवरात्र महोत्सव श्री शके १९४८ ची आज प्रतिपदा तिथी आज नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर अवतार धारण केलेल्या नंदकन्या नंदादेवी या रूपात सजली आहे. दुर्गा सप्तशतीच्या अकरावा अध्यात देवांना शुंभनिशुंभाच्या वधा नंतर वर देताना देवी सांगते की पुन्हा वैवस्वत मन्वंतराच्या 28 व्या द्वापार युगात शुंभ आणि निशुंभ पुन्हा जन्माला येतील तेव्हा तुम्ही नंद गोपाच्या घरी जन्म घेऊन लक्ष्मी श्री इंदिरा कमला या नावाने प्रसिद्ध होईन. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी देवकीच्या उदरी जन्म घेतल्यानंतर माता योगमाया यशोदेच्या पोटी जन्माला आली. भगवान श्रीकृष्णांना गोकुळात ठेवल्यानंतर ही कन्या घेऊन वसुदेव कंसाच्या कारागारात आले तिथून कंसाच्या हातून निसटून ही कन्या विंध्याचल पर्वतावर जाऊन विराजमान झाली म्हणून हिला विंध्यवासिनी असेही म्हणतात मध्य प्रदेशातील देवीचे हे स्थान प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विंध्यवासिनीची स्थाने आहेत. पाली खंडोबाच्या लग्नात करवली ची भूमिका बजावणारी ही इंजाई अनेकांची कुलस्वामिनी देखील आहे. सुवर्ण वर्णाची ही देवी वस्त्रे देखील तशीच सोन्याच्या रंगाची घालते हातामध्ये कमळ पाश अंकुश आणि शंख ही चार आयुधे धारण करणारी ही देवी सोन्याच्या रंगाच्या कमळावर विराजमान असते.

आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई याच रूपात विराजमान आहे यशोदेच्या उदरी जन्मलेली ही कन्या तुम्हा आम्हा सर्वांचे सदैव मंगल करो हीच प्रार्थना.

error: Content is protected !!