ओसरगाव मळीवाडी ग्रामस्थांचा जलसंवर्धनाचा आदर्श

श्रमदानातून बांधला कच्चा वनराई बंधारा

कणकवली (प्रतिनिधी) : पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवण्यासाठी ओसरगाव मळीवाडी येथील ग्रामस्थांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानांतर्गत ओढ्यावर कच्चा मातीचा बंधारा उभारला आहे.

या बंधाऱ्यामुळे पावसाचे वाहते पाणी जागेवरच अडवले जाणार असून ते जमिनीत जिरून परिसरातील विहिरी आणि शेतीला उपयुक्त ठरणार आहे. हा संपूर्ण बंधारा ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारला आहे.

या कामासाठी जेसीबीसाठी प्रसाद कदम, रोहन दळवी, विजय दळवी, उमेश तळेकर कुटुंबीय आणि साशंक गवस यांचे मोलाचे आर्थिक सहाय्य लाभले. तसेच श्रमदान करत असलेल्या ग्रामस्थांसाठी दीपक धुरी यांच्याकडून शीतपेय वाटप करण्यात आले.

या श्रमदान मोहिमेत पांडुरंग शिंदे, जनार्दन कदम, मधुकर कदम, अनंत दळवी, भिकाजी तळेकर, दीपक तळेकर, दिगंबर चव्हाण, उमेश तळेकर, दशरथ शिंदे, दीपक धुरी, राजू धुरी, स्वप्नील तळेकर, गुरूदत्त तळेकर, प्रशांत धुरी, किरण धुरी, अर्जुन तळेकर, सोहम दळवी आणि कु. पर्णिका शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!