पोलंड देशातील 20 सदस्यीय युवा प्रतिनिधींची पादत्राण उत्पादन केंद्रास भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जामसाहेब मेमोरियल युथ एक्सचेंज 2026 अंतर्गत पोलंड देशातील 20 सदस्यीय युवा प्रतिनिधी मंडळ कोल्हापूर दौऱ्यावर आले आहे. यावेळी त्यांनी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या पादत्राण उत्पादन केंद्र, कोल्हापूर येथील उत्पादन केंद्रास भेट देऊन चर्मोद्योगाची पारंपारिकता, स्थानिक रोजगार व आर्थिक महत्त्व याबाबतची माहिती घेतली.

या भेटीप्रसंगी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापक विकास कुंटूरकर व पादत्राण उत्पादन केंद्र, कोल्हापूरचे व्यवस्थापक अमोल शिंदे यांनी पोलंड देशातील 20 सदस्यीय युवा प्रतिनिधींचे स्वागत केले व कोल्हापुरी चप्पल निर्मिती उत्पादन कशाप्रकारे केले जाते. पारंपारिक पद्धतीने व आधुनिक पद्धतीने दोन्ही प्रकारचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. उत्पादन केलेले खास कापशी पुडा, कापशी कुरुंदवाड, नाचे मयुरी, आतनी, ए बी सी डी डिझाईन इत्यादी प्रकारच्या चपला याप्रसंगी दाखविण्यात आल्या. यावेळी क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक सुहास पाटील आदी उपस्थित होते.

या भेटी दरम्यान कोल्हापुरी चप्पलला जीआय मानांकन प्राप्त असलेले उद्योजक संभाजी सातपुते (सावर्डे), दत्तात्रय सातपुते (बाजार भोगाव), सतीश सातपुते (सावर्डे), संदीप रोटे, (सावर्डे दुमाला), विजय शिंदे, (कोल्हापूर), अनिता लोकरे, (कोल्हापूर), संगीता माने, (कोल्हापूर), अनिल पवार, (बाजारभाव), यांनी पोलंडच्या समितीला कोल्हापुरी चप्पल संदर्भात उत्पादन, महत्व, खर्च व इतर सविस्तर माहिती दिली.

error: Content is protected !!