कणकवली (प्रतिनिधी) : 20 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा.आ.केंद्र कनेडी व टेलीमेडिसिन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरासाठी मा. संजना सावंत (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष)भा.ज.पा.उपाध्यक्ष,संजय सावंत (सरपंच, सांगवे), मा. प्रफुल्ल काणेकर (उपसरपंच), मयुरी मुंज (माजी सरपंच, सांगवे) व विजय भोकटे (विभागीय अध्यक्ष),मयुरी मुंज, संतोष सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात डॉ. स्वप्नाली मेस्त्री व डॉ. मनुजा भोसले (वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र कनेडी). यावेळी एनसीडी स्टाफ श्रुतिका कदम, आरोग्य सहायिका सौ. मराठे, विश्राम सावंत (सफाई कर्मचारी), टेलीमेडिसीन प्रकल्प समन्वयक सचिन पांचाळ, सिस्टर मयुरी ठाकूर, आरोग्य सेवक राजन बिडये, गतप्रवर्तक वैष्णवी ठाकूर तसेच आशा सेविका यांनी कार्य केले.गावातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.












