कुडाळ (प्रतिनिधी) : नगरपंचायतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरमुळे झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ नगरपंचायत हद्दीत लावण्यात आलेले बॅनर काढण्याचे काम सुरू होते. बॅनर ट्रॅक्टरमध्ये टाकून आणले जात असताना अचानक चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि तो अनियंत्रित झाला. अनियंत्रित झालेल्या या ट्रॅक्टरखाली दोन दुचाकीस्वार चिरडले जाऊन गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले.
जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक उपचारासाठी त्यांच्यावर वैद्यकीय प्रक्रिया सुरू आहे. या अपघाताची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यात झाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.












