वेंगुर्लेत भाजप तालुका कार्यालयात महात्मा गांधीं व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !!!

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले भाजपा कार्यालयात महात्मा गांधीं व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जेष्ठ कार्यकर्ते दिपक भगत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी भारतरत्न मा.पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधीं यांच्याबद्दल गौरव उद्गगार काढताना म्हणाले कि, भारताच्या राजकीय क्षितिजावर साधेपणा, सचोटी आणि असामान्य ध्येयनिष्ठा या गुणांनी तळपणारे एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे लाल बहादूर शास्त्री . ” जय जवान जय किसान ” या एकाच घोषणेने त्यांनी संपूर्ण राष्ट्राला नवी उर्जा दिली.

तसेच मोहनदास करमचंद गांधी हे केवळ एक नाव नाही तर सत्य,अहींसा आणि साधेपणा या मुल्यांचा जिवंत वारसा आहे. 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे जल्मलेला सर्वसामान्य माणुस पुढे जगाला शांततेच्या क्रांतीची दिशा देणारा युगपुरुष बनला.

यावेळी विष्णू उर्फ पपू परब, प्रसन्न उर्फ बाळू देसाई, राजन गिरप, सुहास गवंडलकर,सुषमा खानोलकर, राजबा सावंत, सुभाष बोवलेकर, अनिल तेंडोलकर, सत्यवान पालव, संजय मळगावकर, हेमंत गावडे, प्रणव वायंगणकर, ज्ञानेश्वर केळजी, चेतना रजपूत, श्रेया मयेकर, ईशा मोंडकर, मनवेल फर्नांडिस, रसिका मठकर उपस्थित होते.

error: Content is protected !!