भोसले फार्मसी कॉलेजमध्ये १३ जूनला फार्मसी करिअर मार्गदर्शन सत्र….

बांदा (प्रतिनिधी) : यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फार्मसी अभ्यासक्रम व करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन शनिवार १३ जून रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सत्रात सीईटी सेल मार्फत होणारी प्रवेश प्रक्रिया, कॅप राउंड्स, प्राधान्यक्रम भरण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे तसेच विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय फार्मसी क्षेत्रातील करिअर संधी, उच्च शिक्षणाच्या दिशा आणि उद्योगक्षेत्रातील रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय जगताप हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी ते भोसले नॉलेज सिटी दरम्यान मोफत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यात आली असून हे मार्गदर्शन सत्र पूर्णपणे विनामूल्य आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी नावनोंदणीसाठी ९८२३९१६००५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!