विद्यार्थ्यांनी संगणक साक्षर होणे गरजेचे – जयेंद्र रावराणे

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या माहिती तंत्रज्ञान विभागास मान्यता

वैभववाडी (प्रतिनिधी) : सध्या संगणक तंत्रज्ञानाच्या युगात सर्व क्षेत्रात वाढता संगणकाचा अंतर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांनी संगणक साक्षर होणे गरजेचे आहे, असे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांचे मत होते. त्यानुसार वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने वैभववाडी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शालेय जीवनात संगणकाचे ज्ञान मिळावे, या हेतूने वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या दोन वर्षांपासून माहिती तंत्रज्ञान विभाग सुरू करण्यात आला होता. त्यास शासकीय मान्यताप्राप्त झाल्याने आता विद्यार्थ्यांना एच.एस.सी परिक्षेस माहिती तंत्रज्ञान विषय घेऊन परिक्षेस सहभागी होता येणार आहे. याबाबत विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून विद्यार्थी व पालक यांच्या वतीने वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!