माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी मंत्री नितेश राणे यांचेकडे केली मागणी
वैभववाडी (प्रतिनिधी) : आचरा, कणकवली, कनेडी, फोंडा, उंबर्डे रस्ता रा. मा.181 कि.मी. 63/750 ते 88/850 हा राज्यमार्ग उंबर्डे वैभववाडी फोंडा या मार्गावर पूर्णतः ना दुरुस्त झालेला आहे. या रस्त्याला अंदाजे 125 कोटींची तरतूद राज्य शासना मार्फत व्हावी, यासाठी नामदार नितेश राणे मंत्री मत्स्य व बंदरे विकास महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांची मंगेश लोके यांनी मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले.
या रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ठिकठिकाणी रस्त्याची चाळण झालेली आहे.अनेक वेळा या मार्गावर अपघात होवून काही माणसे दगावली आहेत. हा राज्यमार्ग सुधारणे व काँक्रीटीकरण करणे (बाजूपट्टी, सुधारणा, काँक्रीट गटारासह) होणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या स्तरावरून विशेष प्रयत्न करून आचरा, कणकवली, कनेडी, फोंडा, उंबर्डे रस्ता रा. मा.181 कि.मी. 63/750 ते 88/850 (बाजूपट्टी, सुधारणा, काँक्रीट गटारासह) होणे गरजेचे आहे.












