मुंबई (प्रतिनिधी) : कुंभवडे ग्रामस्थ संघ, मुंबई आयोजित ७३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेचा स्नेहमेळावा रविवार दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ. शिरोडकर हायस्कूल, परेल, मुंबई येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कुंभवडे गावातील जेष्ठ नागरिक, उद्योजक सेवानिवृत्त, लग्नाचा सुवर्णमहोत्सव साजरा केलेल्या दांपत्यांचा, विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा कार्यगौरव सन्मान सोहळा यावेळी पार पडला.
संस्थेचे अध्यक्ष प्रमोद कृपाळ अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुंभवडे गावचे सुपुत्र तथा संसदपटू विद्यमान खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. ७ राष्ट्रीय व ३८ राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी व कुंभवडे गावचे सुपुत्र, साहित्यिक शिक्षक शशिकांत तांबे यांना सन्मानचिन्ह,शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देवून खा. अरविंद सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संस्थेचे सचिव विजय सावंत, दै. पुढारी रायगडचे संपादक शशिकांत सावंत, गावातील ग्रामस्थ, आप्तेष्ट, माहेरवाशिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कविटकर यांनी केले. शशिकांत तांबे यांच्या सन्मान सोहळ्याचे अभिनंदन व कौतुक समाजाच्या विविध स्तरातील लोकांनी केले व शुभेच्छा ही दिल्या.












